पाणी फवारणी व धूलीकण कमी करणाऱ्या वाहनाचे लोकार्पण

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहु महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे  आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून वाहन खरेदी करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 32 लाख  इतका खर्च आला आहे. वॉटर मिस्ट सिस्टम वापरुन वातावरणातील धूलीकण सेप्रेशन करणे, रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, रोडवर पाणी स्प्रिकिंग करणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, ग्रीन बेल्ट शॉवर सिस्टिम, डिव्हायडर मधील झाडांना पाणी मारणे यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे हाय ट्री वॉटर सिस्टिम आणि तातडीच्या कालावधीमध्ये फायर फायटरसाठी वाहनाचा वापर केला जाणार आहे.

०००

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००