‘अ‍ॅग्रीस्टॅक’ :- शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे…!

शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या विकासासाठी आणि सरकारी योजनांचा सहज लाभ घेण्यासाठी शासनाने ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.

शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे फायदे

शासनाच्या कृषीविषयक योजना अधिक पारदर्शक आणि जलद कार्यान्वित करण्यासाठी हे ओळखपत्र उपयुक्त ठरेल. त्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

✅ थेट सरकारी अनुदान व मदत

पीएम किसान सन्मान निधी – दरवर्षी थेट बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तसेच पीक विमा आणि कर्ज मंजुरी – तातडीने प्रक्रिया, कृषी अनुदान, खत व बियाणे योजनेचा जलद लाभ

✅ आधुनिक शेतीसाठी मदत

हवामान अंदाज, आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती,मृदा परीक्षण व खत सल्ला

✅ राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य

नवीन कृषी तंत्रज्ञान, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिबक सिंचन, गटशेती योजनेतील लाभ,गटगटवारी नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्वाचे ठरणार आहे.

शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया

आपल्या गावात किंवा तालुक्यातील अधिकृत केंद्रावर जाऊन आपण सहज नोंदणी करू शकता.

📍 नोंदणी केंद्र:

✔ ग्रामपंचायत कार्यालय

✔ CSC सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर)

✔ आपले सरकार सेवा केंद्र

✔ तलाठी कार्यालय

📌 नोंदणीसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक?

▪️आधार कार्ड

▪️आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक

▪️७/१२ उतारा (जमिनीचा दाखला)

नोंदणी मोफत असून, तातडीने नोंदणी करा!

शेतकरी बंधूंनो, ही नोंदणी पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता, आपल्या हक्काचे शेतकरी ओळखपत्र तात्काळ मिळवा. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीच्या उत्पादनात वाढ करा!

शेतकऱ्यांचा विकास – देशाचा विकास!

0000

✍ युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

000