सातारा दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचा आदर्श ठेवूनच शासन काम करीत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवराय हे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्र राज्य अधिक प्रगतशील करण्याचे शासनाचे धोरण आहे.
०००