‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची २६ ते २८ दरम्यान मुलाखत

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन २३ रोजी प्रसारण

मुंबई, दि. २१: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात तसेच महासंचालनालयाचे एक्स, फेसबुक आणि यू -ट्यूब या समाजमाध्यमांवरून ’98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त’ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26, गुरूवार दि. 27 आणि शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. खालील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘मराठी’ भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने नुकताच मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा दिला आहे. ही तमाम मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेचा वैश्विक स्तरावर प्रचार व प्रसार व्हावा याअनुषंगाने राजधानी दिल्ली येथे आजपासून 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत  ’98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मराठी भाषेच्या विकासात साहित्य संमेलनांची भूमिका व युवा पिढीचा सहभाग’ या विषयावर प्रा. डॉ. नाईकवाडे यांनी मुक्त संवाद साधला आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं