कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेट; शेतकऱ्यांचे  कृषि विभागाचे केले कौतुक

सातारा, दि. २३ : फलटण – कृषि विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यावतीने सातारा सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नाविन्यपूर्ण बाब म्हणून कृषी प्रदर्शनामध्ये ११ स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत  घोषित करण्यात आलेले सातारा जिलह्यापासून २० किमी अंतरावर असलेले फलटणच्या दक्षिण दिशेला असलेल्या गावात १९ प्रकारची फळे सलग व ६ प्रकारची फळं झाडे बांधावर अशी एकूण २६ प्रकारचे फळझाडे लागवड या ठिकाणी केलेले आहेत. याबाबत प्लेक्स द्वारे सविस्तर माहिती देणारे  स्टॉल तयार करण्यात आले होते. स्टॉलमध्ये शेतकऱ्यानी पिकविलेल्या फळांच्या टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेटी दिली. याप्रसंगी त्यांनी  फळांचे गावविषयक माहिती जाणून घेतली. गावातील फळंपिकाची माहिती  विषयी  महेंद्र धुमाळ, सुशील फडतरे, दत्तात्रय धुमाळ, समीर पवार, त्रिंबक फडतरे यांनी दिली. यावेळी कृषि सेवा रत्न सचिन जाधव यांनी या गावात कृषि विभागांतर्गत रबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली

फळांचे गाव धुमाळवाडी इतर गावांसाठी आदर्श असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले. भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या विविध फळ पिकांविषयी माहिती घेत त्यांनी कष्ट व परिश्रमाच्या जोरावर फळबाग लागवड करून एक आदर्श इतर गावांसाठी ठेवला असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे व कृषि विभागाचे कौतुक  केले.

यावेळी प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर, उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (सातारा) भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी (फलटण) खलीद मोमीन, तालुका कृषी अधिकारी (फलटण) दत्तात्रय गायकवाड तसेच सातारा सांगली, कोल्हापूर विभागाचे अधिकारी उपस्थित होते

000