मुंबई, दि. २८ : महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.
यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनवाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाबळेश्वरमधील ‘महा फेस्टिवल’साठी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामांच्या जबाबदाऱ्यांविषयी श्री. देसाई यांनी निर्देश दिले. फेस्टिवल दरम्यान पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, स्वच्छता, वाहतुकीचे नियोजन, येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यासंदर्भात तसेच महोत्सवाच्या कामांसाठी जिल्हा आणि स्थानिक स्तरावर नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/