विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा

Oplus_131072

मुंबई, दि. २८ :  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी  सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय  सुविधा आणि अधिवेशन पूर्व तयारीचा आढाव घेतला.

विधानभवनमध्ये झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधान मंडळाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) विलास आठवले यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, पोलिस उपायुक्त  अविनाश देशमुख संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत विधान भवन परिसरात गर्दी होणार नाही याची  पोलिस  विभागाने दक्षता घ्यावी. या काळात वाहतूक व  पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करावे. अधिवेशन कालावधीत मंत्रालय  अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवेश, स्वच्छता, पाणीपुरवठा यासंदर्भात चर्चा झाली. अधिवेशन कालावधीत प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस गृह, सामान्य प्रशासन, महापालिका, आरोग्य, वाहतूक, टेलिफोन निगम, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, रेल्वे यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/