मुंबई दि. १ : राज्यातील राष्ट्रीय विधि विद्यापीठे आणि मुंबईतील उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथील इमारतीच्या बांधकाम या कामांना गती देवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी व मुंबई उच्च न्यायालयाच्या बीकेसी कॉम्प्लेक्स संदर्भात बैठक झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती आर व्ही घुगे, न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे, न्यायमूर्ती ए एस किलोर, न्यायमूर्ती डांगरे, न्यायमूर्ती श्री. कर्णिक, न्यायमूर्ती श्री चांदोरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सचिव डॉ श्रीकर परदेशी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील राष्ट्रीय विधि विद्यापीठे आणि मुंबईतील उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथील इमारतीच्या बांधकामाच्या कामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या व मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथील इमारतीच्या बांधकामासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करण्यात आला.
०००