मुंबई, दि. ३ : गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयातील सुसज्ज दालनात प्रवेश केला.
मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील क्रमांक ६२८ हे दालन श्री. कदम यांचे असणार आहे. यावेळी राज्यमंत्री कदम यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दालन प्रवेशानंतर राज्यमंत्री कदम यांनी त्यांच्याकडे असलेल्या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
०००
नीलेश तायडे/विसंअ/