मुंबई, दि. ३ : बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ पार पडला. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदिसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, आयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.
बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह
आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या की, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.
यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, उत्कृष्ट विशेषगृह, उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व, सहायक पोलीस आयुक्त, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस उपनिरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट बाल कल्याण समिती, पोलीस हवालदार, उत्कृष्ट बालगृह, पोलीस शिपाई, बालस्नेही पुरस्कार, पोलीस अंमलदार, उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी, उत्कृष्ट खुले निवारा गृह, उत्कृष्ट काळजी वाहक, उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बालस्नेही पुरस्कार २०२४
उत्कृष्ट जिल्हाधिकारी :
नाशिक विभाग – श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.
नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.
पुणे विभाग – श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.
अमरावती विभाग – श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.
छत्रपती संभाजी नगर विभाग – दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.
उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :
पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.
नाशिक विभाग – श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.
अमरावती विभाग – श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.
नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.
उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :
पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.
नागपूर विभाग – श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर
कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण
उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :
अमरावती विभाग – श्री. गिरीष पुसदकर, अकोला
नागपूर विभाग – श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.
पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.
कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.
नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.
उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष
कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी
नाशिक विभाग- नंदुरबार.
नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.
छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी
अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.
पुणे विभाग- कोल्हापूर.
उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :
कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर
नाशिक विभाग- धुळे
अमरावती विभाग- बुलढाणा
नागपूर विभाग- गडचिरोली
पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर
छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, धाराशीव.
उत्कृष्ट खुले निवारागृह :
नाशिक विभाग-आस्था नाशिक, कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई
उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :
छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे, परभणी.
अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती
कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड
नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.
उत्कृष्ट काळजी वाहक :
नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक
पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृह, सांगली .
छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.
उत्कृष्ट समुपदेशक :
अनिता निकम,ठाणे.
उत्कृष्ट बाल कल्याण समिती :
नागपूर विभाग – चंद्रपूर, अमरावती विभाग – यवतमाळ, कोकण विभाग – रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग – धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग – छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी. पुणे विभाग – पुणे CWC-2, सातारा.
उत्कृष्ट बालगृह :
नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय, नागपूर
छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.
अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती
पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, कराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर
कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्प, उल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.
उत्कृष्ट विशेषगृह :
छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.
अमरावती विभाग- सुर्योदय बालगृह, अकोला.
नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.
पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी संस्था, पंढरपूर
कोकण विभाग- MDC होम मानखुर्द, मुंबई उपनगर.
उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :
नागपूर विभाग- शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.
नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.
छत्रपती संभाजी नगर विभाग- जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर
पुणे विभाग- दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली
कोकण विभाग- निरीक्षणगृह / बालगृह, लांजा, रत्नागिरी.
उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :
कोकण विभाग – भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.
नाशिक विभाग – आधार आश्रम, नाशिक
छत्रपती संभाजी नगर विभाग – जीवन आशा ट्रस्ट ,परभणी
पुणे विभाग – जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.
उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :
१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशन, पुणे, श्री. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध पुणे
२. डॉ. जयंत पाटील, अधीक्षक, जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला
३. सुनिल नायक, मुख्याध्यापक, ज्ञानविकास विदयामंदिर, नंदन, नागपूर
४. किशोर देशपांडे, सावली केअर सेंटर, कोल्हापूर
५. रूद्रीतारा श्रॉफ, मुंबई.
बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वंयसेवी संस्था यांना सन्मानित करणे आले :
१. डॉ. कँरोलिन आँडाँयर डी व्हाँल्टर, होप फाँर चिल्ड्रन
२. युनिसेफ, महाराष्ट्र
३. प्रेरणा
४. श्री. येशूदास नायडू, इंटरनँशनल जस्टीस मिशन
५. श्रीमती शाहिन मिस्त्री, टिच फाँर इंडिया
६. कमिटेड कम्युनिटिज डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई
७. ओरियंट कन्सलटन्सी सर्व्हिसेस, पुणे
८. श्रीमती किन्नी कौल, माइंड्स आई
९. श्रीमती आँड्रे डीमेलो, मजलीस
उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व :
नागपूर- विशाल घोडमारे, शेखर संतोष उईके. अरूण आनंद मारकाम.
छत्रपती संभाजी नगर- कु. प्रतीक्षा तात्याराव बोर्ड, राजेश देविदास मिरगे, कु. बांगर शुभ होसराव.
पुणे – डॉ. शुभांगी किशोर भोर,
अकोला- सागर प्रकाश मोरे, योगेश गुजांळ, दिक्षा वाकोडे, प्रज्ञा वाकोडे, दिपाली इंगोले, सोनाली इंगोले. मुंबई -मनिषा खरात
पोलीस अधीक्षक :
अमरावती ग्रामीण- विशाल आनंद, कोल्हापूर- महेंद्र कमलाकर पंडित, वाशीम- श्री. अनुज तारे, गडचिरोली- निलोत्पल,जालना- अजयकुमार बंसल, मुंबई शहर- श्रीमती. रागसुधा आर. लातूर- सोमय मुंडे. धुळे- श्रीकांत धिवरे. सोलापूर शहर -श्रीमती डॉ. दिपाली काळे.
सहाय्यक पोलीस आयुक्त :
पिंपरी चिंचवड शहर – डॉ. विशाल हिरे.
पोलीस निरीक्षक :
मुंबई शहर- दिलीप प्रल्हाद तेजनकर, मीरा-भाईंदर वसई-विरार- सुजितकुमार तुकाराम गुंजकर, सोलापूर शहर – महादेव राऊत, पिंपरी चिंचवड शहर – अरविंद पवार, नागपूर शहर – महेश पाटीलबा-आंधळे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) – नंदिनी चानपुस्कार, छत्रपती संभाजीनगर – गजानन कामाजी कल्याणकर.
सहाय्यक पोलीस निरीक्षक :
मुंबई शहर – दिनेश यशवंत शेलार, नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) – संजय देविचंद्र पवार, नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) – सुधीर भालचंद्र खोडवे, लातूर – दयानंद हरीचंद्र पाटील.
पोलीस उपनिरीक्षक :
मीरा-भाईंदर, वसई-विरार- प्रसाद शिवाजी शेनोळकर, छत्रपती संभाजी नगर शहर-इसाफ अस्मानखा पठाण आणि राधा काशिनाथ लाटे, सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) – सुरेखा शिंदे
गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र) – अमोल सूर्यवंशी.
पोलीस अंमलदार :
छत्रपती संभाजीनगर शहर- हिरा अशोक चिंचोलकर.
पोलीस हवालदार :
लोहमार्ग मुंबई – निलीमा पदमाकर गांगवे, पिंपरी चिंचवड शहर – दिपाली शिक्रे,
छत्रपती संभाजी शहर – वर्षा अण्णासाहेब पवार, रणजितसिंग मदनसिंग चव्हाण, विजय उत्तमराव तेलुरे, गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र) – जमीलखाँ पठाण, सातारा – पी.व्ही. वाघमारे
पोलीस शिपाई :
लोहमार्ग मुंबई – पुजा सुरेश मोहेर, बुलढाणा (अमरावती परिक्षेत्र ) – योगिता वासुदेवराव शेळके, गोपाल मूकूंदे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) – वैशाली प्रभाकर भांदक्कर, पुनम संतोष मंजुटे, प्रिती हेतराम बुरेले, गायत्री सेवकराम बरेजु, राजेंद्र मनोहर अंबादे. सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) – अर्चना मस्के.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/