सुपा-पारनेर ‘एमआयडीसी’तील कंपन्यांच्या तपासण्या करून अहवाल सादर करावा – उद्योगमंत्री उदय सांमत

मुंबई, दि. ६ : सुपा – पारनेर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या तपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावीया समितीमध्ये महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून तेथील सुरू असलेल्या उद्योगांची तपासणी करून अहवाल शासनाला तातडीने सादर करावाअसे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

उद्योजकांना संरक्षण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून त्यांनी उद्योगक्षेत्राचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना अथवा तक्रारींना न घाबरता काम करावेअसे आवाहनही उद्योगमंत्री उदय सांमत यांनी केले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे सुपा – पारनेर व अहिल्यानगर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआमदार काशिनाथ दातेआमदार मोनिका राजळेमाजी खासदार सुजय विखे-पाटील,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे  सदस्य सचिव अविनाश ढाकणेउद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोडपुणे एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सांमत म्हणाले कीउद्योगांसाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण आहे. मात्र एमआयडीसीमध्ये उद्योगांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर करणाऱ्या कंपन्याबाबत शासन कठोर भूमिका घेईल. महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या  नियमांचे उल्लंघन केले जावू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले कीमहसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या नियमांचे उल्लघंन कंपन्यांकडून होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांच्या पालनासंदर्भात सर्व तपासणी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/