मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामे व जनकल्याणांच्या योजनांमुळे विकासकामात महाराष्ट्र नवी झेप घेईल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्री जाधव-पाटील म्हणाले की, राज्यात पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक वाढत आहे. राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत मोठी वृद्धी होणार आहे. तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार अभियान 2.0, क्रीडा, पर्यटन, कोयना जल पर्यटन यासारख्या योजनांमुळे विकासाला चालना मिळणार आहे. राज्यातील सर्व वर्गाला न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
०००
ऐकनाथ पोवार/विसंअ