मुंबई, दि. १३ : आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत काँग शियानहुआ यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली.
बैठकीला चीनच्या उप वाणिज्यदूत वांग अवेई व उप वाणिज्यदूत शियोंग फांगशिंग देखील उपस्थित होते.
०००