मुंबई, दि.१९: न्यूझीलंड बरोबर झालेले सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचे आहेत. जे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ आणि जवळचे करणार आहेत. भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील संबंध अधिक प्रगाढ आणि व्यापक करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील एक मोठा भाग म्हणजे निश्चितच दोन्ही देशांमधील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील सबंध वाढवणे हा असल्याचे प्रतिपादन न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी केले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे पंतप्रधान लक्सन यांनी भेट दिली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथील सर दिनशॉ पेटिट आंतरराष्ट्रीय अधिवेशन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य नियामक अधिकारी श्रीमती कमलाकर, उच्चायुक्त, माजी गव्हर्नर जनरल, आयुक्त आणि कौन्सिलर जनरल तसेच न्यूझीलंडमधील व्यापार प्रतिनिधीमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सेन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य नियामक अधिकारी श्रीमती कमलाकर यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही आशियातील सर्वात जुनी शेअर बाजारपेठ आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज १५० वा वर्धापन साजरा करत आहे.
न्यूझीलंडचे पॉलिसी म्युझियम आणि एज्युकेशन आणि आयआयटी मद्रास, वित्तीय आणि भांडवली बाजार प्रशिक्षण क्षेत्रातील बीएसई इन्स्टिट्यूट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाले. यावेळी पॉलिसी म्युझियम अँड एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिट्टी, बीएसई इन्स्टिट्यूट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. व्ही. नरायण आणि आयआयटी मद्रासचे कार्यकारी संचालिका एस. प्रीती उपस्थित होते.
०००
गजानन पाटील/ससं/