मुंबई, दि. १९: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० ते २५ मार्च २०२५ या कालावधीत सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रातील १४० हून अधिक स्टॉलधारक सहभागी होणार असून, विविध जिल्ह्यांतील महिला बचतगटांनी तयार केलेली उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित केली जाणार आहेत. हस्तकला, बांबू उत्पादने, हातमाग वस्त्रप्रकार, पारंपरिक ग्रामीण उत्पादने यांसारख्या विविध उत्पादनांची खरेदी या प्रदर्शनात करता येणार आहे. तसेच विविध ग्रामीण व शेतकरी महिला बचतगटांद्वारे तयार केलेले खास पारंपरिक पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. माविमकडून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.
विविध जिल्ह्यांतील महिलांच्या कुशल हातांनी तयार केलेल्या उत्कृष्ट हस्तकला,, बांबू उत्पादने, आणि स्थानिक पदार्थ एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी येथे मिळणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन माविमने केले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/