राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कलाकर्तृत्वाचा गौरव – पणनमंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून अभिनंदन

The Minister of State for Culture (I/C) and Environment, Forest & Climate Change, Dr. Mahesh Sharma presenting the Dayawati Modi Award for Art, Culture & Education Award, to Shri Ram V. Sutur, at the Dayawati Modi Birth Anniversary Celebration, in New Delhi on November 17, 2018.

मुंबई दि. २० : सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कलाकृती साकारल्या आहेत. शंभराव्या वर्षी देखील त्यांच्या डोळ्यापुढे केवळ जगातील उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे ध्येय आहे. त्यांनी अनेक महापुरुषाच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्याकरिता त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आज त्याच अजरामर आणि अप्रतिम शिल्पकृती साकारणाऱ्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा आणि समर्पणाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

पणन मंत्री रावल म्हणाले की, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आमच्या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र असून गोंदूर हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली आहेत. त्यामध्ये जगप्रसिध्द सरदार वल्लभभाई पटेल (स्टॅच्यू ऑफ युनिटी) यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम त्यांनी केले आहे. याचबरोबर देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी अनेक महापुरुषांची शिल्प साकारली आहेत. त्यांनी भगवान बुद्ध, भगवान महावीर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह महान विभूतींची शिल्प अत्यंत चित्तवेधकपणे साकारल्या आहे. आपल्या प्रतिभासंपन्न कलाकर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्रा बरोबर धुळे जिल्ह्याचे नावलौकीक सातासमुद्रापार केला आहे, असे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/