मुंबई, दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते चक्रा फाऊंडेशन आयोजित मिशन आझादी अंतर्गत ट्रिब्युट वॉलचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळा गार्डन याठिकाणी ट्रिब्युट वॉल उभारण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्यांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी चक्रा फाऊंडेशनच्या मार्फत ही ट्रिब्युट वॉल उभारण्यात येणार असून यापद्धतीच्या ट्रिब्युट वॉल देशातील विविध भागात उभारण्यात येणार असल्याची माहिती चक्रा फाऊंडेशनचे श्री. राजशेखर यांनी यावेळी दिली.
0000
वंदना थोरात/विसंअ/