राज्यपालांच्या हस्ते बॉबकार्डच्या ‘स्त्री टेक प्रगती‘ अभियाना अंतर्गत ‘शक्ती समृद्धी‘ व ‘लक्ष्मी समृद्धी‘ या उपक्रमांचे उदघाटन यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या उपक्रमांतर्गत महिला बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयातील मुलींमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता याबाबत जनजागृती केली जाणार आहे. बॉबकार्डच्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून आहान फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आज जगात सर्वाधिक आर्थिक डिजिटल देवाण घेवाण भारतात होत आहेत. अशावेळी डिजिटल यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्वच समाज घटकांमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे असे सांगून आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी आगामी काळात आपण राज्यातील अधिकाधिक आदिवासी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहात १० पैकी सात पदके मुली जिंकत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण होत असताना कुटुंब व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बळकट राहणे आवश्यक आहे. महिला बचत गटांमामुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती होत असून विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे व त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास जाती सर्वांचा विकास झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी शासनाच्या महिला विषयक योजनांची माहिती दिली.
राज्यपालांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील निवडक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या डिजिटल लॅबसाठी संगणक वाटप करण्यात आले तसेच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र राय, आहान फाउंडेशनच्या विश्वस्त शिल्पा चांडोलकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, बॉबकार्डचे सीएसआर प्रमुख रवी खन्ना यांसह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.
0000
Maharashtra Governor launches Women Empowerment, Cyber Security Initiatives of BOBCARD
Mumbai, 27th March : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan launched the BOBCARD’s Tech Pragati programme for Women Empowerment and Financial Literacy through Cyber Awareness at Y B Chavan Auditorium in Mumbai on Thursday (27 Mar).
The programme is being run by BOBCARD as part of its CSR responsibility with the help of Ahaan Foundation.
Under the programme, Cyber Awareness and financial literacy will be created among women’s self help groups and girl students of Schools and Colleges.
Minister of State for Women & Child Development Meghna Bordikar, MD & CEO of BOBCARD Ravindra Rai, Trustee of Ahaan Foundation Shilpa Chandolkar, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Deputy Secretary S Ramamoorthy, HR and CSR Head of Bobcard Ravi Khanna, principals of schools, members of Self Help group were present.
The Governor handed over computers to the Principals of selected Schools in Thane district for their digital labs.
0000