मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज शुभेच्छा देण्यात आल्या. महासंचालक श्री. सिंह यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे तसेच महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी श्री. कांबळे आणि श्रीमती देशपांडे – पाटोदकर यांनी त्यांच्या सेवा कालावधीत महासंचालनालयाच्या कामकाजात भरीव योगदान दिले आणि अनेक विविध व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, अशा शब्दात त्यांचा गौरव केला.
संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले की, श्री.कांबळे यांनी महासंचालनालयाच्या कामकाजात नवतंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केली आणि कार्यप्रणालीत नाविन्यता आणली. त्याचा लाभ महासंचालनालयाच्या कामकाजात झाला.
संचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांनी दयानंद कांबळे आणि मयुरा देशपांडे – पाटोदकर यांचे महासंचालनालयातील कामकाजातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक (प्रशासन) गोंविद अहंकारी यांनी देखील मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर यांनी सत्कार स्वीकारुन महासंचालनालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.
000
संजय ओरके/विसंअ/