पंढरपूर दिनांक 29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.
000000