मुंबई,दि. ०४: सोळावा वित्त आयोग येत्या ८ व ९ मे, २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १६ व्या वित्त आयोगाच्या दौ-याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर, सदस्य एस. चंद्रशेखर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाच्या सचिव ए.शैला, यांच्या सह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या दोन दिवसीय दौऱ्यासंदर्भात वित्त विभागाद्वारा करण्यात येत असेलल्या तयारीबाबत अपर मुख्य सचिव गुप्ता यांनी सविस्तर सादरीकरण केले.
०००