बीड, दि. 22 (जि.मा.का.) : जिल्ह्यात उसतोड कामगारांची संख्या खूप मोठी आहे. मात्र याबाबतची नोंदणी कमी आहे त्यामुळे या कामगारांच्या नोंदणीसह प्रधान्य द्यावे त्यासोबत या कामगारांच्या घरातील महिला आणि मुलींच्या आरोग्याची तपासणी होईल याचीही व्यवस्था करा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील दौ-यात आज विविध विभागाच्या कामांचा आढावा त्यांनी आज घेतला यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुख अधिका-यांची उपस्थिती होती.
यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून महिला सुरक्षाविषयक बाबींचा एका बैठकित आढावा घेतला. मुली विशेषत: शालेय व महाविद्यालयीन मुलींना छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे यातच येथील एका मुलीने धाराशिव येथे आत्महत्या केली तिच्या कुंटुंबियांशी भेट घेऊन श्रीमती गो-हे यांनी या प्रकरणी न्याय मिळवून देऊ असे तिच्या कुंटुंबियास सांगितले. सदर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्या कुटुंबाला सांत्वनासह मदतीचे पूर्ण आश्वासन आज श्रीमती गो-हे यांनी दिले.
मुलींसाठी /महिलांसाठी मदत क्रमांक
कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा इतर स्वरुपाचा त्रास दिला जात असेल तर त्यासाठी स्वतंत्र असा whatsapp क्रमांक 92250 92389 जारी करण्यात आला आहे. यावर सर्वांना मदत मागता येईल तसेच तक्रार करता येणार आहे. ही माहिती पोलीस अधिक्षकांनी यावेळी दिली हा क्रमांक सर्व ठिकाणी पोहाेचवा, असे निर्देश श्रीमती गो-हे यांनी दिले.
पाणी पुरवठा
जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी बीड शहराच्या पाणीपुरवठयाबाबत यावेळी आढावा घेण्यात आला तालुक्यामध्ये 90 दिवस पुरेल इतका पेयजल साठा आहे.
जलजीवन योजने अंतर्गत 940 कामे प्रगतीपथावर आहेत तथापी याची 800 योजनांमध्ये पाणी पुरवठा सुरु देखील झाला आहे त्यामुळे सध्या टॅकरची मागणी नाही मात्र नियोजनाचा भाग म्हणून 10 विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली.
बीड शहराला पाणी पुरवठा अतिशय विलंबाने होतो त्यामुळे शहरात अधिग्रहण करुन विहिरीतून पाणी पुरवठयाचे नियोजन करा असे निर्देश श्रीमती गो-हे यांनी दिले.याबाबत प्रस्ताव पाठवा असेही निर्देश त्यांनी नगर परिषदेचे मुध्याधिकारी निता अंधारे यांना दिले.
गर्भपिशवी शस्त्रक्रिया
आरोग्य विभागाने राबविलेल्या उपायांमुळे जिल्हयात 35 वर्षाखालील स्त्रियांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. याबाबत उपसभापती यांनी समाधान व्यक्त केले.
याचसोबत उसतोड महामंडळातर्फे अन्य हेळ निर्माण करुन उसतोड कामगारांच्या कुटुंबियाना आरोग्य तपासणी व इतर सुविधाबाबत प्रस्ताव करा असेही त्या म्हणाल्या.
नरेगा
ग्रामीण रोजगार हमी योजनेत 365 दिवस काम दिले जाते यात केंद्रातर्फे 100 व राज्यातर्फे 265 दिवस असे नियोजन आहे. यात जिल्हयाचे काम अतिशय चांगले आहे असे त्या म्हणाल्या.
नरेगातून ग्रामीण भागात उद्याने आणि खेळासाठी मैदानांचा समावेश करण्याच्या दृष्टीनेाकोणतुन येत्या काळात नियोजन करा असेही श्रीमती गो-हे यांनी सांगितले.