मुंबई, 29 : ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.
निर्मल भवन येथे ऊर्जा विभागातर्फे २८ एप्रिल ते १२ मे, २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तयारीचा आढावा घेताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महावितरणचे उपसचिव नारायण कराड, सह सचिव उद्धव डोईफोडे, मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे संचालक अरविंद बाधिकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि विद्युत निरीक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
सेवा पंधरवड्याची शपथ विभागाच्या प्रत्येक कार्यालयात घेण्यात यावी. पंधरवड्याच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सोयीसुविधांनी सुसज्ज करावे, जेणेकरून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्याची कार्यपद्धती अधिक प्रभावी करावी, असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.
0000