मुंबई, दि. ३० : मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई या कार्यालयातील मारूती इको (पेट्रोल) या चार वाहनांची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाची बोलीची सुरूवातीची प्रत्येक वाहनाची प्रत्येकी किंमती ४० हजार रूपये एवढी आहे. या वाहनांचा लिलाव मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई येथे बुधवार, ७ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
ही वाहने या ठिकाणी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत २ ते ६ मे २०२५ या कालावधीत पहावयास उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीकरीता सहा. प्रबंधक (लेखनसामग्री), मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी केले आहे.
****
नीलेश तायडे/विसंअ/