- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
- सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. ०१ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस् बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटी, ॲडम मोसरी, आदर पुनावाला, अजय बिजली, अक्षत राठी, अक्षय विधानी, भूषण कुमार, चांघाम किम, चार्ली जेफरी, डायन स्मिथ गंडर, एकता कपूर, प्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौद, सुबासकरण अलीराजाह, शूजी उत्सुमी, शरद देवराजन, शंतनू नारायण, संकेत शाह, संजीव गोयंका, राल्फ सिमोन, राजन नवानी, पिरोजशा गोदरेज, नितीश मिटरसेन, अलेक्झांडर झरोव, क्रिस रिप्लेय, दिनेश विजन, लिझवेटा ब्रॉडस्काया, हर्ष जैन, फरहान अख्तर, हार्वेय मासोन, हिरोकी टोटोकी, जोंग बम पार्क, लुईस बॉसवेल, महेश सामत, मार्क रीड, नमीत मल्होत्रा, निल मोहन उपस्थित होते.
भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतील, असा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.
०००
संतोष तोडकर/विसंअ/