मुंबई, दि. ०१ : वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते.
भारत पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाच्या ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या पॅव्हेलियनलाही पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. यावेळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध पॅव्हेलियनला भेट देत करमणूक आणि दृकश्राव्य माध्यमांमधील नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तर गेमिंग आर्केडला भेट दिल्यानंतर त्यांनी गेमिंग क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध संधी याविषयी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांसह या क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, तसेच विविध मानोरंजन आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्था यांनी त्यांचे पॅव्हेलियन उभारले आहेत.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/