यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजुरी दिलेल्या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्यातील १४ वैयक्तिक वनहक्क दावे धारकांना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित या वितरण कार्यक्रमप्रसंगी आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे उपस्थित होते.
यावेळी केळापूर, घाटंजी, झरी जामणी तालुक्यातील लाभार्थ्यांना डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते पट्टे वाटप करण्यात आले. त्यात कमलाकर कनाके, धर्मा पेंदोर, नागोराव आडे, महादेव पेंदोर, नागोराव चिकराम, जनाबाई कुळसंगे, पुरुषोत्तम तोडसाम, ज्ञानेश्वर सिडाम, समदुराबाई कनाके, गजानन मेश्राम, माधव मेश्राम, धर्मा सोयाम, मारोती मरस्कोल्हे, लखमा आशाम या लाभार्थ्यांना वनहक्क पट्टे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे सहायक महसूल अधिकारी विलास वानखेडे , जिल्हा वनहक्क व्यवस्थापक रुपेश श्रृपवार, तालुका वनहक्क व्यवस्थापक नितीन राठोड व शैलेश कणेर हे उपस्थित होते.
00000