बीड, दि. 19 (जि.मा.का.) बीड जिल्ह्याची सचित्र आणि उत्तम अशी मांडणी कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे पुस्तक कुणालाही आपल्या संग्रही ठेवावे असे वाटेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी केले.
बीड जिल्हा माहिती कार्यालयातर्फे नियोजन निधीतून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा विमोचन सोहळा पार पडला.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने तसेच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
0000