पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. २७ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव मोहन काकड, अवर सचिव सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

०००