‘दिलखुलास’ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची २८ ते ३० मे दरम्यान मुलाखत

मुंबई, दि. २७: ‘शंभर दिवसाच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत अंतिम मुल्यमापनात पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आघाडीवर होती. तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानातही या महापालिकेने सर्वोत्तम कामगिरी केली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या विशेष मुलाखतीचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 28, गुरूवार दि. 29, शुक्रवार दि. 30 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आयुक्त सिंह यांनी वरील उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुलभता व लोकाभिमुखता कशी आणता येते.  कामाची जबाबदारी निश्चित करून ते वेळेत पूर्ण करणे आणि तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी वापर कसा करावा याची माहिती दिलखुसास कार्यक्रमातून दिली आहे. तसेच कर संकलन वाढीसाठी राबविलेले नवनवीन उपक्रम, ऑनलाइन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग आणि यूपीआयसी आयडी अशा महत्त्वाच्या विषयांवर कसा भर देण्यात आला आहे, याविषयीची माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं