राजधानीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. 28 :  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा हुंकार पेरणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्र शासनाचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतीकारक नव्हते, तर भारतीय राष्ट्रवादाचे खरे पुरस्कर्ते होते.” त्यांच्या विचारांनी आजही प्रेरणा मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

अमरज्योत कौर अरोरा/ वृत्त विशेष  -119