एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित

मुंबईदि. १२ : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे

या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९००२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाअसे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके  यांनी केले आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/