मुंबई, दि. 5 : उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार उद्या (6 मार्च) रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून होणार आहे. इतर वाहिन्यांवरूनही अर्थसंकल्पाचे सहप्रक्षेपण होईल.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवन प्रांगणातून‘राज्य अर्थसंकल्प 2020-21 एक दृष्टीक्षेप’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.यशवंत पाध्ये, अर्थ विश्लेषक श्रीकांत मोरे, माध्यम तज्ज्ञ जयू भटकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.