मुंबई, दि. १ : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, निवतकर आणि वारभुवन यांना आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली .
आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. याप्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ आणि सतिश देशपांडे यांच्यासह आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, सहसचिव तथा परीक्षा नियंत्रक सरिता बांधेकर- देशमुख, उपसचिव मा. पां. जाधव उपस्थित होते.
०००
राजू धोत्रे/विसंअ/