मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालय समितीची बैठक झाली. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालयामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या डिजिटलायजेशन प्रकल्पांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून सुधारणा करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आणि सूचना करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी लागणारा निधी, कर्मचारी संख्या, डिजिटलायजेशन,अत्याधुनिक पायाभूत सुधारणा अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
ग्रंथालय समिती ही तर्द्थ (ॲडहॉक) समिती असून ही समिती विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या २० सदस्यांची असते.
ग्रंथालय समिती बैठकीकरिता समिती प्रमुख महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विशेष निमंत्रित सदस्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच समिती सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार, श्री.सुधीर गाडगीळ, डॉ. मनीषा कायंदे, श्री. सुनील शिंदे, श्रीमती सुलभा गायकवाड, श्रीमती सई डहाके, श्री.अतुल भातखळकर, श्री.ज्ञानेश्वर कटके, श्री.राजेश विटेकर, श्री.मनोज जामसुतकर, श्री.अनिल मांगुळकर, श्री.अमित गोरखे, श्री.शिवाजीराव गर्जे, श्री.अभिजित वंजारी आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ.विलास आठवले, सचिव-४ श्री.शिवदर्शन साठ्ये, ग्रंथपाल माहिती आणि संशोधन अधिकारी श्री.निलेश वडनेरकर, श्री.शत्रुघ्न मुळे, श्री.त्रिभुवनदास पाटील उपस्थित होते.
००००