सातारा दि.२१ : जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आवारातील गाळ्यात उमेद मार्ट सुरु करण्यात आले आहे. या मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोज राजे, संजय निकम, सुनिल सूळ, रंजनकुमार वायदंडे, सुरज पवार आणि सर्व तालुका अभियान व्यवस्थापक याप्रसंगी उपस्थित होते.
उमेद मार्टमध्ये जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी बचत गटांनी उत्पादित दर्जेदार मालांची खरेदी करावी व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
0000