‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या “आपलं मंत्रालय”  या  गृहपत्रिकेच्या जून २०२५ या अंकाचे प्रकाशन  प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी  सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक (माहिती)(प्रशासन) हेमराज बागुल, उपसंचालक(प्रशासन) गोविंद अहंकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये पर्यावरण धोरण, २०२४ अंतर्गत शासनाची भूमिका, पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती, तसेच, पर्यटनाशी निगडित आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक पर्यटन विकास, व स्थानिक समुदायांच्या सहभागाची भूमिका यावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित प्रवासवृत्तांताचा समावेश या विशेषांकात करण्यात आलेला आहे.

0000

अश्विनी पुजारी/ससं/