मुंबई, दि. २६:- यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये मातीचा मलबा ढासळल्याने दि. २५ रोजी सायंकाळी काही काळ वाहतूक बंद झाली होती. याबाबत तात्काळ कार्यवाही करून महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
एक्सप्रेस वे वर ४५/३०० किमी अंतरावर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये रस्त्यावर झाडाच्या फांद्या व काही मातीचा मलबा ढासळला होता. काही काळ वाहतूक बंद झाल्याने त्याबाबत माध्यमातून वृत्त आले होते. एमपीईडब्ल्यू पॉईंट येथे तैनात असलेल्या पथकाने जेसीबी व यंत्रणेच्या सहाय्याने पावणे सात वाजता ते पूर्णपणे दूर करण्यात आले. महामार्गावरील या दोन्ही लेनमधील वरील वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली.
तोपर्यंत एक लेन मोकळी करण्यात आली. त्यानंतर १८:४४ वाजता सर्व लेन मोकळी करण्यात आल्या आणि १८:४५ पर्यंत वाहतूक पूर्णपणे मोकळी झाली. एक्सप्रेसवेची वाहतूक स्थिती सामान्य आहे आणि सर्व लेनमधील सर्व वाहनांसाठी खुली आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
000