मुंबई, दि. २९ : भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्रातील गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके आदी बाबत चर्चा झाली.
००००
गजानन पाटील/विसंअ/