महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे मंत्रालयात प्रदर्शन; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट

मुंबई, दि. 5 : राज्यातील लघुउद्योजक महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासन आणि  उद्योगिनी प्रतिष्ठानमार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दि. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन महिला उद्योजकांशी थेट संवाद साधला व त्यांना प्रोत्साहन दिले.

उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मीनल मोहाडीकर यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले आहे. राज्यभरातील 20 पेक्षा अधिक महिला उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू, मिलेट फूड, आयुर्वेदिक उत्पादने आणि इतर विविध प्रकारच्या स्थानिक उत्पादनांचा समावेश आहे.

00000

श्रद्धा मेश्राम/विसंअ