मुंबई, दि. १२: ‘जागतिक अवयवदान दिना’निमित्त शासन स्तरावर ‘अंगदान जीवनदान संजीवनी अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी याविषयावर राज्य अवयवदान समन्वय समितीचे संचालक, यकृततज्ज्ञ आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत बुधवार दि. 13, 14 आणि 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. ही मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी ‘जागतिक अवयवदान दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून, त्याविषयी असलेले गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानाबाबत समाजात अद्यापही भीती आणि चुकीच्या समजुती असल्याने अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 3 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘अंगदान जीवनदान संजीवनी अभियान’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अवयवदानाची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवून, मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी प्रेरित करणे हे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. शुक्ला यांनी या मोहिमेची अंमलबजावणी आणि अवयवदानाचे महत्त्व याविषयी माहिती दिली आहे.
०००