मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘महिलांचे हक्क व सुरक्षितता‘ या विषयावर महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या, शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होईल. तर’दिलखुलास‘ कार्यक्रमात शुक्रवार दि. ६ आणि सोमवार दि. ९ मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महिला व बालविकास विभागाची जबाबदारी, अंगणवाड्यांचा विकास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग, महिला आणि बालकांसाठी योजना, राजकारणात महिलांचा सहभाग यासह जागतिक महिला दिनानिमित्त आवाहन ॲड.यशोमती ठाकूर यांनी ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात केले आहे.