मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील प्रांगणात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

यावेळी लाचलुचपत प्रतिबंध संचालनालयाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, एमव्हीआयआरडीसी चे चेअरमॅन डॉ. विजय ग. कलंत्री, एआयएआयच्या वरिष्ठ संचालक संगिता जैन, ट्रेड ॲड इन्व्हेस्टमेंट प्रमोशनच्या संचालक प्रिया पानसरे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
00000