छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, इस्लामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.