पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आकांक्षित तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

निती आयोगाच्या अभियानात पुसद व झरी तालुक्याची कामगिरी

यवतमाळ, दि. १८ (जिमाका): नीती आयोगाच्यावतीने जिल्ह्यातील पुसद व झरी जामणी या तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाच्यावतीने या तालुक्यांना संपूर्णता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामासाठी गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या तालुक्यांतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महसूल भवन येथे आयेजित या कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विजय वाघमारे आदी उपस्थित होते.

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील पुसद आणि झरी जामणी या तालुक्यांची आकांक्षित तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. आयोगाच्यावतीने देशभरतील आकांक्षित तालुक्यांमध्ये संपुर्णता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पुसद येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची निवड करण्यात आली असून तालुक्यातील 4 निर्देशांकामध्ये संपृक्तता प्राप्त झाल्याने ब्राँझ पदक जाहीर करण्यात आले. तसेच झरी जामणी तालुक्यातील 1 निर्देशांकामध्ये संपृक्तता प्राप्त झाली आहे.

यासाठी कार्य करणाऱ्या दोनही तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सन्मानपत्र देऊन गौरविले. त्यात पुसदचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंदेलवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव सरकुंडे, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी पर्यवेक्षक नितीन नरवाडे, आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो पायल पारधी, वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक पोले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पंकज शेळके, आरोग्य सहाय्यक प्रमोद इंगळे, आरोग्य सेविका अश्विनी कसंबे, आरोग्य सेवक सचिन गोरे, तालुका कार्यक्रम सहाय्यक देवराज राठोड, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक आशिष गुप्ता, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक सुजाता टारफे, आशा स्वयंसेविका सुचिता वाघमारे यांचा समावेश आहे.

तसेच झरी जामणी तालुक्यातील गटविकास अधिकारी रवींद्र कुमार सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन गेडाम, आकांक्षिक तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे, तालुका कार्यक्रम सहाय्यक गणेश सिडाम, आरोग्य सेविका पुजा सौंदरकर, आरोग्य सेविका विजयालक्ष्मी रामगीरवार, आरोग्य सेविका तकलपेलेवार, गटप्रवर्तक प्रणिता नगराळे यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

०००