उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ‘सद्भावना दिना’ची प्रतिज्ञा
मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000
श्री.निलेश तायडे/विसंअ/