राजधानीत माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि.२० : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली.

यावेळी आर. विमला यांनी माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली