वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासनाचे सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
8

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई,दि. 2 : वस्रोद्योगामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. अडचणीत असलेला हा उद्योग टिकण्यासाठी  तसेच रोजगार निर्मितीत वाढ होण्यासाठी वस्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील,उद्योगमंत्री सुभाष देसाई,वस्रोद्योग मंत्री अस्लम शेख,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आमदार भारत भालके,आमदार सुमन पाटील,वस्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज,वित्त सचिव राजीव मित्तल,सहकारी,खासगी सूत गिरण्यांचे प्रतिनिधी,वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वस्रोद्योगासमोरील अडचणी लक्षात घेता सूतगिरण्यांना वीजदरात सवलत देण्यासंदर्भात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली वित्त,उर्जा,वस्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव तसेच सहकारी,खासगी सूत गिरण्यांचे प्रतिनिधी यांनी बैठक घ्यावी. इतर राज्यात मिळणाऱ्या वीज दरातील सवलती तसेच महाराष्ट्रातील वीजदर याबाबत चर्चा करून प्रस्ताव सादर करावा,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था येण्यासाठी शासनाची मदतीची तयारी असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

जसंअ/उपमुख्यमंत्री कार्यालय/2.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here