‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्यापासून ‘महाराष्ट्र सायबर’चे पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

0
13

मुंबई, दि.१२ :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सोशल मीडिया : आपण व आपली जबाबदारी, या विषयावर राज्य सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. १३ ऑगस्ट, शुक्रवार दि. १४ ऑगस्ट व सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेन्द्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लॉकडाऊन काळात वाढलेले सायबर गुन्हे व केलेली कारवाई, सोशल मीडिया वापरताना घ्यायची काळजी, चुकीच्या पोस्ट शेअर केली तर यावर केलेली कारवाई, वेगवेगळे अॅप किंवा ईमेल वापरताना पासवर्ड कसा सुरक्षित ठेवावा, मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल, ऑनलाईन खरेदी करताना घ्यायची काळजी याबाबत सविस्तर माहिती डॉ. राजपूत यांनी ‘ दिलखुलास ‘ मध्ये दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here