मुंबई, दि, 28 : लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पित ‘शब्दसृष्टी’ या हिंदी – मराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकात संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित इंग्रजी, मराठी आणि हिंदी यातील 100 हून अधिक लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हा विशेषांक साहित्यकार, संशोधक, समाजसेवक आणि शिक्षकांना बहुमूल्य असा आहे.
या प्रकाशन कार्यक्रमास संपादक प्रा.डॉ.मनोहर, टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, शब्दसृष्टीचे समन्वयक संपादक डॉ. सतिश पावडे, सहसंपादक प्राचार्य मुकुंद आंधळकर, प्रसिद्धी प्रमुख डॉ. अनिल गायकवाड, अतिथी संपादक डॉ. दिनकर येवलेकर, संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर आदी उपस्थित होते.